gogate-college

कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात डॉ. आंबेडकर जयंती निमित्त वैविध्यपूर्ण ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Books Exhibition

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. १४ एप्रिल रोजी वैविध्यपूर्ण असे ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. विष्णू मगरे यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, डॉ. दळवी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. तर कार्यक्रमप्रसंगी उपप्राचार्य डॉ. मिलिंद गोरे, डॉ. यास्मिन आवटे, ग्रंथालय समिती समन्वयक डॉ. मंगल पटवर्धन, प्रा. तुळशीदास रोकडे, डॉ. शाहू मधाळे, प्राध्यापक, अध्यापक, विद्यार्थी आणि ग्रंथालय कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. आंबेडकरविषयक ग्रंथ, दुर्मिळ ग्रंथ, हस्तलिखिते, ऑडीओ-व्हिज्युअल साहित्य, ऑनलाईन ई-रिसोअर्स, ई-बुक्स, टॉकिंग बुक्स इ. वाचन साहित्य प्रदर्शित करण्यात आले होते.

डॉ. मगरे उपस्थितांनी मार्गदर्शन करताना म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नेहमीच दुर्मिळ ग्रंथ आवडत असत. ग्रंथांवर मनस्वी प्रेम करणारा असा हा महामानव होता. आजचे ग्रंथप्रदर्शन खूपच छान आणि सर्व विषयस्पर्शी आहे, हे पाहून मला आनंद होत आहे’ असे नमूद करून त्यांनी ग्रंथालयाच्या सर्व उपक्रमांना शुभेच्छा व्यक्त केल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन प्र-ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे यांनी केले. या उपक्रमाच्या आयोजनाकरिता प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांचे मार्गदर्शन आणि ग्रंथालय कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Books Exhibition
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Books Exhibition
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Books Exhibition
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Books Exhibition
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Books Exhibition
Comments are closed.