gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालय ऑनलाइन एम. कॉम. परीक्षा फॉर्मविषयी

मुंबई विद्यापीठाच्या एम. कॉम. (सेमिस्टर दोन-फ्रेश) परीक्षेचे फॉर्म ऑनलाइन भरावयाचे आहेत. सदर फॉर्मची एक प्रत विद्यार्थ्यांना त्यांची सही घेण्यासाठी दि. २५ मार्च २०१९ ते दि. २७ मार्च २०१९ या दिवशी स. ११.०० ते दु. ०१.०० पर्यंत या वेळांप्रमाणे देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी सदर फॉर्मवर आपले नाव (मराठी आणि इंग्रजी), विषय इ. माहिती तपासूनच सही करावी. परीक्षा अर्जासोबत सेमिस्टर १ प्रवेशपत्र झेरॉक्स आणि परीक्षा शुल्क रु. १४६८ आणावे.

वरील निर्देशित केल्याप्रमाणे संबंधित विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या कार्यालयात कॅश काउंटर येथे उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

Comments are closed.