gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात घरडा केमिकल्स लि. कंपनीचे दि. ७ एप्रिल रोजी कॅम्पस इंटरव्ह्यू

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्लेसमेंट सेलतर्फे एम.आय.डी.सी., लोटे पर्शुराम येथील नामांकित अशा घरडा केमिकल्स लि. या कंपनीकरिता कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन शनिवार दि. ७ एप्रिल २०१८ रोजी करण्यात आले आहे. सदर इंटरव्ह्यू प्रामुख्याने एम.एस्सी., भाग-२ करिता एप्रिल-मे मद्धे परीक्षा देणारे आणि एम.एस्सी. परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या ऑरगॅनिक व अॅनालीटीकल केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांकरिता घेण्यात येणार आहेत.

निवड प्रक्रीयेमद्धे प्री-प्लेसमेंट टॉक, रिटन टेस्ट आणि पर्सनल इंटरव्ह्यू इ. बाबींचा समावेश असणार आहे. प्रक्रियेची सुरुवात सकाळी ०९.३० वाजता गोगटे जोगळेकर महाविद्यालय सेमिनार हॉल, मुख्य इमारत येथे होईल. तरी सबंधित विद्यार्थ्यांनी नियोजित वेळेआधी १५ मिनिटे अगोदर आपल्या मूळ कागदपत्रे आणि बायोडेटासहित उपस्थित रहावे.

कॅम्पस इंटरव्ह्यूबाबतच्या अधिक माहितीकरिता डॉ. उमेश संकपाळ (९७६४४१४६१२) आणि प्रा. रुपेश सावंत (९४२११४२५२९) यांचेशी संपर्क साधावा आणि महाविद्यालयातर्फे उपलब्ध करून दिलेल्या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

Comments are closed.