gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील कु. गौरी पवार व कु. श्रद्धा लाड यांची अखिल भारतीय स्पर्धेकरिता निवड

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे झालेल्या अखिल भारतीय पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ महिला खो-खो स्पर्धेकरिता गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील कु. गौरी पवार व कु. श्रद्धा लाड या विद्यार्थिनींची मुंबई विद्यापीठ महिला खो-खो संघात निवड झाली होती. या स्पर्धेत मुंबई विद्यापीठ महिला खो-खो संघाला सुवर्ण पदक प्राप्त झाले. या दोघींची निवड उत्तरप्रदेश येथील दिनदयाळ विद्यापीठ येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला खो-खो स्पर्धेकरिता निवड झाली आहे.

कु. गौरी पवार व कु. श्रद्धा यांच्या स्पर्धेतील सुवर्ण कामगिरीबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, क्रीडासंचालक डॉ. विनोद शिंदे, जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, सर्व सदस्य, जिमखाना विभागातील कर्मचारी, महाविद्यालयीन प्राध्यापक आणि कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.

h
कु. गौरी पवार
Comments are closed.