gogate-college

लोकमान्यांच्या जीवनावरील ‘स्वराज माय बर्थ राईट’ या चित्रपट प्रदर्शनाने गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या आर्टस् फिल्म क्लबचे उदघाटन

लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘आर्टस् फिल्म क्लब’चे उदघाटन राधाबाई शेट्ये सभागृहात संपन्न झाले. याप्रसंगी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य आणि नामवंत उद्योजक श्री. विजयराव देसाई, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, लेखक-निर्माते-दिग्दर्शक श्री. विनय धुमाळे आणि फिल्म क्लबचे उपाध्यक्ष प्रा. वासुदेव आठल्ये व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा. आठल्ये यांनी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या फिल्म क्लबचा आढावा घेतला. २००७ मध्ये विख्यात मराठी अभिनेत्री कै. जयश्री गडकरी यांच्या हस्ते उदघाटन झालेली महाविद्यालयाची कॅम्पस फिल्म सोसायटी हि फेडरेशन ऑफ इंडिया या देशव्यापी संघटनेची महाराष्ट्र चॅप्टरमधील मुंबई बाहेरची पहिली कॅम्पस फिल्म सोसायटी आहे. नियमित चित्रपट प्रदर्शनाबरोबरच वसुंधरा आंतराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल सारखे उपक्रमही या सोसायटीमार्फत केले जातात. या सोसायटीशी संलग्न असणारा फिल्म क्लब हा मनोरंजन, जाणीव जागृती आणि चित्रपट क्षेत्रातील कलात्मकतेचा रसग्रहण या तीन उद्दिष्टासाठी काम करतो. शॉर्ट फिल्म मेकिंग कार्यशाळा आणि स्पर्धांचेही आयोजन केले जाते असे सांगितले.
प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून या फिल्म क्लबचे उदघाटन ‘स्वराज्य माय बर्थ राईट’ या चित्रपटाचे लेखक, निर्माते, दिग्दर्शक श्री. विनय धुमाळे यांच्या उपस्थितीत होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच ‘हे महाविद्यालय लोकमान्य टिळकांच्या जन्मभूमीतील असल्याने महाविद्यालय असल्याने लोकमान्य टिळकांची जयंती आणि पुण्यतिथी हे दोन्ही दिवस वेगळ्या प्रकारे साजरे करून विद्यार्थ्यांच्या मनात लोकमान्यांचे स्मरण व प्रेरणा जागृत ठेवते’ असे त्यांनी नमूद केले.
यानंतर श्री. विजयराव देसाई यांच्या हस्ते फिल्म क्लबचे ई-उदघाटन चित्रपटाची जाहिरात प्रदर्शित करून करण्यात आले. यानंतर श्री. धुमाळे यांच्या वीस वर्षांच्या नेहनतीतून साकारलेल्या ‘स्वराज्य माय बर्थ राईट’ या चित्रपटाचे रत्नागिरीतच पहिले प्रदर्शन करण्याची मनीषा बाळगून आलेल्या श्री. विनय धुमाळे यांचा महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना श्री. धुमाळे यांनी हा चित्रपट रत्नागिरीत प्रदर्शित करताना आपल्याला लहान मुलासारखा आनंद होत असल्याचे सांगून आपली खूप वर्षांची तपश्चर्या फलद्रुप झाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. तुम्ही निर्भय असाल तर सत्यासाठी कशाचाही त्याग करण्याचे बळ तुम्हाला प्राप्त होते. लोकमान्य टिळकांच्या जीवनात प्रकर्षाने आणि वारंवार ही बाब व्यक्त होताना दिसते.
यानंतर दोन तास बावीस मिनिटांच्या ‘स्वराज्य माय बर्थ राईट’ चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. यावेळी शिक्षक, विद्यार्थी तसेच लोकमान्यप्रेमी रत्नागिरीकर बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वासुदेव आठल्ये आणि आभारप्रदर्शन प्रा. सचिन सनगरे यांनी केले.

Film club opening
Comments are closed.