gogate-college

र. ए. सोसायटीच्या नैपुण्याचा प्र-कुलगुरू डॉ. विष्णू मगरे यांच्या हस्ते कु. आरती कांबळे हिचा सत्कार

महाराष्ट्र राज्य महिला वरिष्ठ खो-खो संघाचे नेतृत्व

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या २७व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाचे प्र-कुल्गुरे डॉ. विष्णू मगरे यांचे हस्ते महाराष्ट्र राज्य महिला खो-खो सिनियर संघाची कर्णधार समाजशास्त्र विषयाची कु. आरती कांबळे हिचा सत्कार करण्यात आला. आजर्यंत तिने विविध क्रीडा स्पर्धांतून दहा सुवर्ण आणि तीन कांस्य पदकांची कमाई केली आहे.

र. ए. सोसायटीच्या विविध आस्थापनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कौशल्य व नेतृत्व विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात याचेच प्रत्यंतर विद्यार्थ्यांच्या यशातून आपणास पहावयास मिळते. या सातत्यशील प्रयत्नांचा प्र.कुलगुरूंच्या हस्ते झालेला सत्कार ही रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीसाठी अभिमानास्पद व प्रेरणादायी बाब असल्याचे मत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी व्यक्त केले. याप्रसंगी वरिष्ठ महाविद्यालायातील अनेक नैपुण्यप्राप्त वियार्थ्यांचाही या सोहोळ्यात माण्यावार्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Arati Kambale
Comments are closed.