gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या झेप सांस्कृतिक महोत्सवात ‘विविधरंगी प्रदर्शनांचे’ आयोजन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या झेप या सांस्कृतिक महोत्सव तरुणाईने जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा केला. या महोत्सवात सांस्कृतिक कलागुणांबरोबरच महाविद्यालयातील शैक्षणिक विभागांच्यावतीने विविध विषयांना स्पर्श करणारे आणि त्या विषयातील गंमतीजमती, ज्ञान उलगडून दाखविणाऱ्या अनेक प्रदर्शनांचे आयोजन केले होते. या सर्व प्रदर्शनांचे उद्घाटन विविध क्षेत्रातील मान्यवर, माजी विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावर्षीच्या झेप महोत्सवात महाविद्यालयातील भौतिकशास्त्र, प्राणीशास्त्र, गणित, भाषा, संगणकशास्त्र आणि राज्यशास्त्र या शैक्षणिक विभागांनी तसेच महिला विकास कक्षाने वेगवेगळ्या संकल्पना घेऊन अनेक विषयांवरील प्रदर्शनांचे आयोजन केले होते. विविध प्रयोग, उपकरणे, गेम्स, पुस्तक प्रदर्षन, पोस्टर्स, फिल्म, विविध मोडेल्समार्फत अभ्यासल्या जाणाऱ्या विविध संकल्पनांची माहिती प्रदर्शित केली होती. त्याचप्रमाणे विविध कलांचे दर्शन घडविणाऱ्या अनेक कलाप्रकारांचेही प्रदर्शन आयोजित केले होते. यामध्ये प्रामुख्याने पर्यावरण, महिला सुरक्षा, लिंगभाव समानता, अवयवदान अशा संकल्पना समोर ठेऊन विद्यार्थ्यांनी रांगोळी, पेंटिंग, फोटोग्राफी, फाईन आर्ट्स, फोटो एडिटिंग अशा कलेतून आपले कौशल्य दाखवून दिले.

आधुनिक डिजिटल युगात माहिती तंत्रज्ञानावर आधारित लॅन गेमिंग, गेम हाऊस, फनी गेम्स यांचेही प्रदर्शन आयोजित करण्यात आले होत. आय.टी. विभागातील विद्यार्थ्यांनी आयोजित केलेली बाईक रॅली आणि बाजारात येणाऱ्या नवनवीन बाईकचे प्रदर्शन हे अनिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थ्यांनी थाटलेल्या फूड स्टॉलवरही अनेक नाविन्यपूर्ण आणि लज्जतदार पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी खवय्यांनी गर्दी केली होती. विद्यार्थिनींनी तयार केलेल्या विविध कलाकुसरीच्या वस्तुंनीही उपस्थितांची मने जिंकली. ही सर्व प्रदर्शने युवावर्गाची मने जिंकणारी आणि मान्यवरांची शाबासकी मिळवून देणारी प्रमुख आकर्षणे ठरली.

सर्व प्रदर्शनांना र. ए. सोसायटीचे पदाधिकारी, माजी विद्यार्थी श्री. नितीन कानविंदे, श्री. सुधीर बाष्टे, श्री. बिपीन बंदरकर, श्री. दीपक पवार, श्री. सागर पुसाळकर, श्री. विजय मलुष्टे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या.

या संपूर्ण उपक्रमांच्या नियोजनासाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांचे मोलाचे मार्गदर्शन तर आयोजनासाठी उपप्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे उत्तम सहकार्य लाभले.

h
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या झेप सांस्कृतिक महोत्सवात ‘विविधरंगी प्रदर्शनांचे’ आयोजन
Comments are closed.