gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात पदव्युत्तर विद्यापीठ परीक्षा फॉर्म भरणेची मुदत दि. १६ ऑक्टोबर

मुंबई विद्यापीठ पदव्युत्तर विभाग यामध्ये एम.ए., एम.कॉम.,एम.एस्सी. फ्रेश सेमिस्टर एक आणि तीन आणि रिपीटर सेमिस्टर एक आणि दोन करिता परीक्षा फॉर्म मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने भरावयाचे आहेत. सदर फॉर्मची एक प्रत विद्यार्थ्यांना त्यांची सही घेण्यासाठी देण्यात येईल.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक १६ ऑक्टोबर असून आवश्यक दाखले, परीक्षा फी ई. बाबत सविस्तर माहिती महाविद्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कार्यालयात श्री. केतकर यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

Comments are closed.