gogate-college

‘माजी विद्यार्थी संघटना महाविद्यालयातील विकासातील महत्वाची भूमिका बजावू शकते’- श्रीम. शिल्पाताई पटवर्धन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील सर्वकालीन माजी विद्यार्थी संघटना नुकतीच संघटीत करण्यात आली आहे. माजी विद्यार्थी आणि आजी विद्यार्थी यांचा समन्वय साधण्यासाठी दि. २९ सप्टेंबर २०१८ रोजी “आजी-माजी विद्यार्थी संवाद कार्यक्रम” आयोजित करण्यात आला होता.
मुंबई विद्यापीठाच्या अंतिम स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त मराठी एकांकिका ‘म्याडम’ आणि इतर पारितोषिक प्राप्त कार्यक्रम यांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच अनेक उपस्थित असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांपैकी काही माजी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला. तर काही माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त संवादात सहभाग घेतला. यावेळी उपस्थित असलेल्या रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन याप्रसंगी म्हणाल्या की, ‘रत्नागिरी शहरात राहणारे आणि अन्य देश-परदेशात राहणारे माजी विद्यार्थी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या संपर्कात राहिले तर अनेक समाजोपयोगी आणि महाविद्यालयाच्या विकासासाठी माजी विद्यार्थी संघटना महत्वाची भूमिका पार पाडू शकते.

ज्येष्ठ माजी विद्यार्थी आणि प्रतिथयश डॉ. अलिमिया परकार सदर कार्यक्रमाला उपस्थित होते. आजी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक सादरीकरण पाहिल्यानंतर त्यांनी ‘आजच्या विद्यार्थ्यांची ही उर्जा सकारात्मक कार्यासाठी उपयोगी पडली पाहिजे’ असे मनोगत व्यक्त केले.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य आणि माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉ. किशोर सुखटणकर यांनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाबरोबरच रोजगार निर्मितीसाठी करत असलेल्या उपक्रमांबाबत सविस्तर माहिती दिली. आणि भविष्यात होणाऱ्या रोजगार निर्मितीच्या बदलांत माजी विद्यार्थी कशाप्रकारे सहकार्य करू शकतात याबद्दल संवाद साधला.

माजी विद्यार्थ्यांतर्फे श्री. आनंद पाटणकर, श्री. खानोलकर, अॅड. संध्या सुखटणकर, अॅड. श्रीकांत भाटवडेकर, श्री. राहुल धामापूरकर, श्री. गौतम बास्टे, श्री. नितिन मिरकर, अॅड. संकेत घाग यांनी संवादात भाग घेतला. तर श्री. कौस्तुभ सावंत, श्री. विजय मयेकर, श्री. राजेश जाधव यांनी आजी विद्यार्थी रोजगार निर्मितीमध्ये आपण सक्रीय सहभाग देऊ असे सांगितले.

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह आणि माजी विद्यार्थी श्री. सतीशजी शेवडे यांनी संस्था आणि महाविद्यालय यांच्या समन्वयाने राचत्नात्मक कार्यात आपला सहभाग असेल असे आवर्जून सांगितले. या कार्यक्रमाचे संयोजक प्रा. आनंद आंबेकर यांनी सर्वांचे आभार मानले.

Comments are closed.