gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागातर्फे ‘रत्नागिरी इंग्लिश टीचर्स असोसिएशन’ची स्थापना

रत्नागिरी शहर व बाजूच्या परिसरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील इंग्रजीच्या सर्व शिक्षकांना शैक्षणिक बाबींचे परस्पर आदान-प्रदान आणि संपर्कातून एकमेकांना शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी साहाय्य व्हावे यासाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागातर्फे ‘रत्नागिरी इंग्लिश टीचर्स असोसिएशन’ची स्थापना करण्यात आली आहे. विभागाने नुकत्याच आयोजित केलेल्या ‘क्षमता विकास’ कार्यशाळेमध्ये या उपक्रमाची घोषणा करण्यात आली.

प्रत्येक शिक्षक नवीन उपक्रम, नव्या अध्यापन पद्धती, मूल्यमापनाची विविध तंत्रे शोधत असतो. तसेच इंग्रजी ही वैश्विक ज्ञानभाषा असल्याने इंटरनेट महाजालावर भरपूर शैक्षणिक माहिती उपलब्ध आहे. अशा सर्व शिक्षकांना एकत्र आणून शैक्षणिक कार्य उंचावणे हा प्रमुख उद्देश या उपक्रमाचा असणार आहे. कार्यशाळेस उपस्थित असलेल्या सर्व शिक्षांनाही या उपक्रमाचे स्वागत करून सदस्यत्व स्वीकारले आहे. विविध कार्यशाळा, स्पर्धा, वार्षिक स्नेहसंमेलन, अध्यापनातील विविध साहित्य वा प्रयोगांचे WhatsApp, Facebook, Blog अशा माध्यमातून नियमितपणे माहितीचे आदान-प्रदान करण्याचा या असोसिएशनचा मानस आहे.

याकरिता रत्नागिरी शहर आणि परिसरातील इंग्रजीच्या शिक्षकांनी ८०८७११८०१७ या WhatsApp नंबरवर किंवा gjcreta@gmail.com या ईमेलवर स्वतःची नोंदणी करून इंग्रजी विभागाच्या या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन विभागप्रमुख डॉ. अतुल पित्रे यांनी केले आहे.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर आणि उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments are closed.