gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे डॉ. रमेश कांबळे ‘इतिहास संशोधक डॉ. खोबरेकर’ पुरस्काराने सन्मानित

Dr R H Kamble puraskar 2019

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय या शतकोत्तर संस्थेकडून साहित्य, नाट्य, इतिहास विषयक लेखन व संशोधन या संदर्भात दरवर्षी वेगवेगळे पुरस्कार प्रदान केले जातात. इतिहास विषयक लेखन व संशोधनासंदर्भात एक वर्ष आड असा कोकणातील एका लेखकाला ‘इतिहास संशोधक डॉ. वि. गो. खोबरेकर पुरस्कार’ दिला जातो. सन २०१७-१८ या वर्षीचा हा पुरस्कार गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डॉ. रमेश कांबळे यांना नुकताच मुंबई येथे प्रदान करण्यात आला. त्यांच्या ‘ऐतिहासिक शोधनिबंध’ या ग्रंथाची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. सन २००१ ते २०१७ या काळात वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलेल्या शोधनिबंधांचे संकलन म्हणजे हे पुस्तक असून त्यात एकूण चाळीस लेख एकत्रित करण्यात आले आहेत. मराठीतील सुप्रसिद्ध लेखक श्री. भारत सासणे यांच्या हस्ते हा पुरस्कार डॉ. रमेश कांबळे यांना देण्यात आला. सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

त्यांच्या यशाबद्दल गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर आणि महाविद्यालयीन प्राध्यापक यांनी डॉ. रमेश कांबळे यांचे अभिनंदन केले आहे.

Comments are closed.