gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागातील प्रा. विवेक भिडे यांना मुंबई विद्यापीठाकडून पीएच.डी. प्रदान

कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन डॉ. भिडे यांचा सत्कार करताना सोबत प्राचार्य डॉ. कुलकर्णी.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागातील प्रा. विवेक भिडे यांनी मुंबई विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या स्वायत्त भौतिकशास्त्र विभागात डॉ. किशोर सुखटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रबंध सादर केला. ‘Design and development of PC based current-voltage (IV) measurement system with a programmable current source and electrical characterization of high energy AU and Fe implementation in GaAs’ या शीर्षकाखाली त्यांनी प्रबंध सादर केला होता. या संशोधनाच्या अनुषंगाने त्यांना TIFR, मुंबई व IUAC, नवी दिल्ली अशा नामवंत संधोधन संस्थांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त झाली.

प्रा. विवेक भिडे हे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे विद्यार्थी असून ते SET आणि NET या परीक्षा उत्तीर्ण आहेत. तसेच यापूर्वी त्यांनी मुंबई विद्यापीठाची MPhil ही पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर Physics Olympaid करिता भारताच्या चमूला मार्गदर्शन केले आहे. सध्या ते महाविद्यालयाच्या विज्ञान विभागाचे उपप्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. या संशोधनादरम्यान त्यांनी IIT, मुंबईचे प्रा. अरोरा, मुंबई विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा. अनुराधा मिश्रा आणि महाविद्यालयाचे डॉ. किशोर सुखटणकर, डॉ. महेश बेळेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रा. विवेक भिडे यांच्या यशाबाद्द्ल र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, संस्था पदाधिकारी, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Dr. Vivek V. Bhide

Comments are closed.