gogate-college-autonomous-logo

कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘दिवाळी अंकांचे’ उदघाटन संपन्न

Diwali Ank Inaugration

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात नुकतेच ‘दिवाळी अंक’ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उदघाटन मान. प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या हस्ते संपन्न झाले. आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी ‘दिवाळी ही जशी वैविध्यपूर्ण पदार्थ, मिठाई, नवीन कपडे, पणत्या, आकाशकंदील, रांगोळ्या अशा विविधांगांनी आपण साजरी करत असलो तरी, आपल्या या आनंदाला ‘दिवाळी अंकांची सुवर्णकिनार लाभल्याशिवाय परिपूर्णता येत नाही. दिवाळी अंक हाती येताच होणार आनंद वर्णनातीत असतो. इंटरनेट, व्हॉट्स अप, ई-बुक्स इत्यादींची सद्दी असलेल्या आजच्या युगात आपल्यापैकी हरप्रकारे व्यक्त होत असताना, दिवाळी अंकांची महत्व तसूभरही कमी झालेले दिसून येत नाही.’ असे सांगून महाविद्यालयीन ग्रंथालय शंभरपेक्षा अधिक दर्जेदार दिवाळी अंक प्रतिवर्षी खरेदी करत असते असा आवर्जून उल्लेख केला. यावर्षीच्या दिवाळी अंक मांडणीच्या अभिनव संकल्पनेचे त्यांनी कौतुक केले; आणि सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. उत्पल वाकडे यांनी तर आभारप्रदर्शन ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयीन प्राध्यापक, विद्यार्थी आणि ग्रंथालय कर्मचारी बहूसंख्येने उपस्थित होते.

Comments are closed.