gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘दिवाळी अंकांच्या प्रदर्शना’चे उद्घाटन संपन्न

‘दिवाळी अंकांच्या प्रदर्शना’चे उद्घाटन संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात प्रतिवर्षीप्रमाणे ‘दिवाळी अंक २०२०’चे उद्घाटन प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. विवेक भिडे, वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, ग्रंथपाल किरण धांडोरे आणि विद्यार्थी उपस्थित होते. किरण धांडोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना यावर्षीच्या दिवाळी अंकांवर पडलेले कोरोनाचे सावट तसेच दिवाळी अंकातील वैविध्यपूर्ण साहित्याचा आढावा घेतला.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी दिवाळी अंक वाचनाची आवड अधिक वृद्धिंगत होण्याविषयी आवाहन केले. तसेच इ-दिवाळी अंक आणि इतर ग्रंथालयाच्या वाचकाभिमुख सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

सदर प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी ग्रंथालय कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. सहायक ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे यांनी आभारप्रदर्शन केले.

Comments are closed.