gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात सौ. दिलदार लाला यांचा सदिच्छा समारंभ संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात सौ. दिलदार लाला यांचा सदिच्छा समारंभ संपन्न

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील स्टेनोग्राफर सौ. दिलदार मकबूल लाला यांचा सेवानिवृत्तीपर सदिच्छा समारंभ महाविद्यालयात नुकताच संपन्न झाला. सौ. लाला १९८३ पासून स्टेनोग्राफर म्हणून महाविद्यालयात रुजू झाल्या. सेवेच्या ३६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी कार्यालयीन कामकाज करताना विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या हस्ते सौ. लाला यांचा पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्यांनी सौ. लाला यांच्या महाविद्यालयातील सेवाकाळातील उत्तम कार्याचा उल्लेख केला.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात सेवा बजावताना आलेल्या विविध अनुभवातून जीवनात खूप काही नवीन शिकायला मिळाले तसेच पदव्युत्तर विभागाचे काम करत असताना अनेक विद्यार्थ्यांशी संपर्क आल्याचे सांगून महाविद्यालयाला भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी त्यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.

याप्रसंगी श्री. रवींद्र केतकर, श्री. प्रसाद गवाणकर, श्री. महेश सरदेसाई, श्री. विजय काकतकर, नंदकुमार गोळपकर आणि कार्यालयीन कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Comments are closed.