gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात पदवीदान समारंभ संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात 'पदवीदान समारंभ' संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. ८ मार्च २०१९ रोजी पदवी आणि पदव्युत्तर विभागाचा पदवीदान सोहळा संपन्न झाला.

या समारंभासाठी डॉ. भास्कर नाईक, निवृत्त प्राचार्य, शासकीय महाविद्यालय, गोवा; डॉ. नंदकुमार सावंत, प्राचार्य, चौघुले महाविद्यालय, गोवा; रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मुंबई विद्यापीठाच्या दि. मार्च-२०१८ मध्ये घेण्यात मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये कला, शास्त्र आणि वाणिज्य विभागाच्या पदवी आणि पदव्युत्तर विभागाच्या महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या काही प्रातिनिधिक विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यामध्ये मुंबई विद्यापीठाचे सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्या कु. स्वरदा उदय महाबळ (संस्कृत विभाग) आणि कु. सोनल मिलिंद कांबळे (समाजशास्त्र विभाग) यांनाही गौरविण्यात आले.

सदर कार्यक्रमप्रसंगी डॉ. भास्कर नाईक, डॉ. नंदकुमार सावंत आणि डॉ. किशोर सुखटणकर यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मार्गदर्शन श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांनी केले.

सूत्रसंचालन प्रा. आरती पोटफोडे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. आनंद आंबेकर यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात 'पदवीदान समारंभ' संपन्न
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात 'पदवीदान समारंभ' संपन्न
h
Comments are closed.