gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘संविधान दिन’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘भारतीय संविधान दिन’ वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. संविधान दिनाचे औचित्य साधून राज्यशास्त्र विभागाच्या वतीने ग्रंथप्रदर्शन, राज्यघटनेच्या सरनाम्याचे समूहिक वाचन, रेखाटन व छायाचित्र प्रदर्शन, लघुचित्रफित प्रदर्शन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

दि. २६ नोव्हेंबर रोजी कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘संविधान विषयक’ ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले याचे उदघाटन प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना प्रत्येक भारतीय नागरिकाने संविधानाप्रती आदर आणि निष्ठा ठेऊन वागले पाहिजे. घटनेतील तत्वाप्रमाणे वागलो तर निश्चितच देशाचा व्यवहार चोख होईल. राज्यघटना ही एक जिवंत दस्ताऐवज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
राज्यशास्त्र विभागाचे प्रा. निलेश पाटील आणि समाजशास्त्र विभागातील विभाग प्रमुख प्रा. तुळशीदास रोकडे आणि प्रा. शिवाजी उकरंडे यांनी विद्यार्थ्यांना संविधान दिवसाचे महत्व सांगून राज्य घटनेच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन केले. यावेळी उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, डॉ. शाहू मधाळे , प्रा. शिवराज गोपाळे उपस्थित होते.

कला शाखेतील विद्यार्थी आशुतोष नाडकर्णी याने काढलेल्या मसुदा समितीच्या सदस्यांच्या रेखाटनांचे आणि संविधान आणि आपण या विषयाला वाहिलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. याचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. रमेश कांबळे, डॉ. वामन सावंत, प्रा. तुळशीदास रोकडे, डॉ. शाहू मधाळे, प्रा. बिना कळंबटे आणि प्रा. निलेश पाटील यांच्यासह अनेक विद्यार्थी उपस्थित होते.

महाविद्यलयाच्या कला शाखेचा विद्यार्थी आशुतोष नाडकर्णी याने काढलेल्या मसुदा समितीच्या सदस्यांच्या रेखाटनांचे आणि संविधान आणि आपण या विषयाला वाहिलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले. सदर प्रदर्शनाचे उदघाटन प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. रमेश कांबळे, डॉ. वामन सावंत, डॉ. शाहू मधाळे, प्रा. तुळशीदास रोकडे, प्रा. बिना कळंबटे आणि विद्यार्थी उपस्थित होते.

यावर्षीचा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम म्हणजे ‘Come and learn constitutional history & political system of India through film’ हा होय. राज्यशास्त्र विभागातील शिक्षक आणि विद्यार्थी यांनी रत्नागिरीतील जी.जी.पी.एस. या शाळेतील विद्यार्थ्यांना संविधान दिनाचे महत्व सांगून सरनाम्याचे सामूहिक वाचन केले. त्यानंतर संविधानाची मूलभूत माहिती देणारी लघुचित्रफित प्रदर्शित करण्यात आली. गतवर्षीदेखिल विभागातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी रत्नागिरीतील १४ शाळांमध्ये सरनाम्याचे सामूहिक वाचन केले होते.

संविधान दिन साजरा करण्यासाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांचे बहुमोल मार्गदर्शन तर तीनही शाखांचे उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये, प्रा. विवेक भिडे, डॉ. यास्मिन आवटे, विभाग प्रमुख, ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे, कार्यालयातील श्री. प्रसाद गवाणकर, श्री. कुमार काकतकर, शिक्षक आणि शिक्षकेतर  कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Comments are closed.