gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात क्रोमोटोग्राफिक अनालिसिस कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात क्रोमोटोग्राफिक अॅनालिसिस कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातर्फे आयोजित ‘क्रोमोटोग्राफिक अॅनालिसिस कौशल्य विकास’ या कार्यशाळेचा उद्घाटन समारंभ महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात संपन्न झाला. जीसी, एच पी. ए.सी. सारखी अत्याधुनिक उपकरणे वापरून पदार्थ्यांचे पृथ:करण करण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित करण्यासाठी महाविद्यालयाचा रसायनशास्त्र विभाग आणि रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी शिमात्झू अॅनालीटीकलचे डॉ. अजित दातार, फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे श्री. योगेश तेरेदेसाई, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, उपप्राचार्य विवेक भिडे आणि रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मिलिंद गोरे उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी विद्यार्थ्यांना औद्योगिक जगतात आवश्यक कौशल्ये देण्यासाठी अशाप्रकारच्या कार्यशाळा आवश्यक असल्याचे सांगितले. डॉ. अजित दातार यांनी रसायनशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीने अॅनालिसीस करण्याचे कौशल्य अवगत होणे आवश्यक असल्याचे सांगितले. श्री. योगेश तेरेदेसाई यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचा समारोप करताना कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन यांनी अशाप्रकारच्या कौशल्य विकसन कार्यशाळांच्या सत्यात्यापूर्ण आयोजनाबद्दल रसायनशास्त्र विभागाचे अभिनंदन केले. रत्नागिरी परिसरातील इंडस्ट्रीजकरिता आवश्यक ज्ञान आणि कौशल्य याचा मेळ असणारे अभ्यासक्रम तयार करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

या कार्यशाळेमध्ये विविध महाविद्यालयांच्या पदव्युत्तर विभागाचे ९० विद्यार्थी तसेच प्राध्यापक सहभागी झाले. कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन डॉ. मेघना म्हादये यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. मिलिंद गोरे यांनी केले.

Comments are closed.