gogate-college

भाषा सहोदरी हिंदी तर्फे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या डॉ. चित्रा गोस्वामी यांचा विशेष सन्मान

देश विदेशात हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने अस्तित्वात आलेल्या आणि भाषा सहोदरीच्या माध्यमातून विविध नवलेखकांना सामावून घेणाऱ्या संस्थेचे सातवे आंतराष्ट्रीय अधिवेशन नुकतेच दिल्ली विद्यापीठ येथे संपन्न झाले. या अधिवेशनात गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील हिंदी विषयाच्या प्राध्यापिका आणि संशोधक डॉ. चित्रा गोस्वामी यांचा हिंदी विषयातील य्ल्ग्दनाचा विचार करून नवलेखिका म्हणून विशेष सन्मानाने गौरविण्यात आले.

भाषा सहोदरी ही संस्था भाषा प्रचार प्रसाराबरोबरच चांगल्या हिंदी पुस्तकांचे प्रकाशन, हिंदी लेखकांचा सन्मान अशा प्रकारचे कार्य पार पाडते. विशेष सन्मानप्राप्त डॉ. गोस्वामी या पीएच.डी.मार्गदर्शिका असून त्यांचे विविध विषयांवरील अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांना गझल, कवितावाचन यात विशेष रुची असून त्यांनी हिंदी आणि मराठी भाषेत कथा कवितांबरोबरच शोधलेखही केले आहेत. वेगवेगळ्या विषयावर आकाशवाणीवरून अनेक कार्यक्रम त्यांनी सादर केले आहेत.

रत्नागिरी एज्युकेशन संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, हिंदी विभागप्रमुख डॉ. शाहू मधाळे यांनी डॉ. गोस्वामी यांचे विशेष अभिनंदन केले आहे. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या या सन्मानाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

डॉ. चित्रा गोस्वामी
Comments are closed.