gogate-college

अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या चिन्मय फुटक याचे सुयश

अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात इ. १२वी विज्ञान शाखेतील कु. चिन्मय सुनील फुटक याने मर्सिडीज बेंझ या कंपनीतर्फे आयोजित ‘फ्युचर स्टार’ या स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक प्राप्त करून सुयश प्राप्त केले आहे. त्याची आंतराष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे. ऑटोमोबाईल डिझायनिंगकरिता असलेल्या या स्पर्धेत त्याने तयार केलेल्या डिझाईनकरिता हे पारितोषिक देण्यात आले. त्याने सदर डिझाईनचे कॉपीराईट हक्कदेखील प्राप्त केले आहेत. भविष्यात त्याचा ऑटोमोबाईल डिझायनिंगमध्ये करिअर करण्याचा मानस आहे.

राष्ट्रीय पातळीवर सुयश प्राप्त करणाऱ्या कु. चिन्मय याचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, उपप्राचार्या विशाखा सकपाळ, पर्यवेक्षक अनिल उरुणकर, प्रा. चिंतामणी दामले तसेच सर्व शिक्षकांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या चिन्मय फुटक याचे सुयश
Comments are closed.