gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. ४ व ५ मे २०१९ रोजी आय.सी.आय.सी.आय. बँकेकरिता कॅम्पस इंटरव्ह्यू

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कॉमर्स विद्याशाखेतील १४ विद्यार्थ्यांच्या यशस्वी निवडीनंतर पुढच्या टप्प्यात पुन्हा एकदा आय.सी.आय.सी.आय. बँकेकरिता दि. ४ व ५ मी २०१९ रोजी कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सिनियर ऑफिसर’ या पदाकरिता होणाऱ्या या इंटरव्ह्यूकरिता महाविद्यालयातून २०१५-१६, २०१६-१७ आणि २०१७-१८ या वर्षात पदवी घेतलेल्या कोणत्याही विद्याशाखेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित राहू शकतात. तसेच २०१८-१९ मध्ये अंतिम वर्षाची पदवी परीक्षा दिलेले विद्यार्थीसुद्धा सहभागी होऊ शकतात. दोन दिवस चालणारी ही प्रक्रिया दि. ०४ मे रोजी सकाळी ११.३० वाजता सुरु होईल. इच्छुक विद्यार्थ्यांनी येताना सोबत आपली मूळप्रमाणपत्रे, बायोडेटा, दोन फोटो, आधारकार्ड व पॅन कार्ड ई. कागदपत्रे आणावीत.

या मुलाखती महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीमध्ये ‘डॉ. केळकर सेमिनार हॉल’ येथे होतील. याविषयी अधिक माहितीकारिता डॉ. रुपेश सावंत (९४२११४२५२९), डॉ. उमेश संकपाळ (९७६४४१४६१२) आणि डॉ. रामा सरतापे (९४२११८६४२३) यांच्याशी संपर्क साधावा. इच्छुक विद्यार्थ्यांनी या सुसंधीचा फायदा घ्यावा असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

Comments are closed.