gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात बी.एस्सी.च्या विद्यार्थ्यांकरिता दि. १३ रोजी ऑक्टोबर कॅंपस इंटरव्ह्यू

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या करिअर गायडन्स आणि प्लेसमेंट सेलतर्फे महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता रत्नागिरीस्थित एका नामांकित निर्यातभिमुख कंपनीच्यावतीने कॅंपस इंटरव्ह्यूचे आयोजन शनिवार दि. १३ ऑक्टोबर २०१८ रोजी करण्यात आले आहे.

या कॅंपस इंटरव्ह्यूकरिता महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या आणि शास्त्र शाखेतून कोणत्याही विषयात पदवी (बी.एस्सी.) प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित रहाता येईल. तरी रत्नागिरीतील फिश प्रोसेसिंग क्षेत्रातील नामांकित उद्योग समूहामद्धे आपले करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी (केवळ पुरुष उमेदवार) आपल्या मूळ कागदपत्रांसह महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीमध्ये उपस्थित रहावे. अधिक माहितीकरिता डॉ. उमेश संकपाळ (९३५९८७००१८) आणि प्रा. रुपेश सावंत (९४२११४२५२९) यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

Comments are closed.