gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कम्युनिकेशन सेवा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीकरिता कॅम्पस इंटरव्ह्यू

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या करिअर गायडन्स आणि प्लेसमेंट सेलकडून कम्युनिकेशन सेवा क्षेत्रातील अग्रगण्य आणि नामवंत कंपनीकरिता कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २६ फेब्रुवारी २०१९ रोजी महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीत कै. ज. शं. केळकर सेमिनार हॉल येथे सकाळी ०९.३० वाजता ‘सेल्स ट्रेनी’ या पदाकरिता सदर मुलाखती आयोजीत करण्यात आल्या आहेत. या मुलाखतीकरिता महाविद्यालयातून २०१७-१८ या वर्षी कोणत्याही विद्याशाखेतून पदवी घेतलेले विद्यार्थी उपस्थित राहू शकतात.

तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीकरिता प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंत ९४२११४२५२९ यांचेशी संपर्क साधावा. विद्यार्थ्यांना नामवंत कंपनीमद्धे काम करण्याची संधी उपलब्ध होत असून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या संधीचा उपयोग करून घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

Comments are closed.