gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. १२ ऑक्टोबर रोजी आय.सी.आय.सी.आय. बँकेकरिता कॅम्पस इंटरव्ह्यू

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या करिअर डेव्हलपमेंट-प्लेसमेंट सेल आणि एन.आय.आय.टी., मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने दि. १२ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता आय.सी.आय.सी.आय. बँकेकरिता सिनियर ऑफिसर या पदांकरिता कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले आहे. याकरिता बँकेने ठरविलेल्या निकषांनुसार पात्र उमेदवारांच्या निवड प्रक्रिया व मुलाखती होणार आहेत. सदर प्रक्रियेमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयातून पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले प्रामुख्याने २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. या भरती प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा, टेक्नीकल टेस्ट, एच.आर. इंटरव्ह्यू असे टप्पे असतील.

मुलाखतीसाठी उपस्थित राहताना आपला बायोडेटा, आयकार्ड, पॅनकार्ड, फोटो, मार्कलिष्ट इ. मूळ कागदपत्रे आणावीत. कोविडबाबत सरकारने जारी केलेल्या सूचना व लागू केलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

मुलाखतीबाबत अधिक माहितीसाठी करिअर डेव्हलपमेंट-प्लेसमेंट सेलचे डॉ. रुपेश सावंत (मोबा. ९४२११४२५२९), डॉ. उमेश संकपाळ (मोबा. ९३५९८७००१८), डॉ. रामा सरतापे (मोबा. ७८८७३१७२३३) यांच्याशी संपर्क साधावा; तसेच या संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले आहे.

Comments are closed.