gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या बी.एम.एस. विभागाचा निकाल ९०.२५%

मुंबई विद्यापीठाच्या एप्रिल-२०१८ मध्ये  घेण्यात आलेल्या सहाव्या सत्राचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत कु. भाग्यश्री अमृत पटेल आणि कु. ज्योती विजय भुस्कुटे यांनी ‘ओ’ श्रेणी; कु. अंजुम हमजा काझी, कु. स्टेफी जॉय, कु. श्रावणी गिरीश काळे, कु. ऐश्वर्या उत्तम ओसवाल, कु. श्रुती वेल्ल्ये यांनी ‘ए’ ग्रेड संपादन केली आहे.
बी.एम.एस. विभागाचा निकाल ९०.२५% लागला असून या विभागाने आपली उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थी आणि प्राध्यापक यांचे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments are closed.