gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘टाकाऊ वस्तुंपासून मुल्यवर्धित वस्तुंची निर्मिती’ विषयावर व्याख्यानमाला संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विज्ञान मंडळातर्फे ‘मुल्यवर्धित वस्तुंची निर्मिती’ या विषयावर दि. 07 फेब्रुवारी 2020 रोजी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. सदर व्याख्यानमालेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, विज्ञान उपप्राचार्य प्रा. विवेक भिडे, रसायनशास्त्र विभागाचे डॉ. प्रफुल्ल कुलकर्णी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद, पुणे श्री. राजेंद्रकुमार सराफ हे लाभले होते.

श्री. सराफ यांनी मुल्यवर्धित वस्तुंची निर्मिती व गरज यासंबंधी मार्गदर्शन केले. पर्यावरणपूरक टाकाऊ वस्तुंची पुनप्रक्रिया ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे असे मत त्यांनी आपल्या व्याख्यानमालेत मांडले. याचबरोबर कोकणात उपलब्ध असणाऱ्या व्यवसायाच्या संधीवरही त्यांनी प्रकाश टाकला.

सदर व्याख्यानासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकवर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना विज्ञान मंडळाचे समन्वयक प्रा. शरद आपटे यांनी केली. तसेच सुत्रसंचालन प्रा. गोडबोले तर उपस्थित मान्यवरांचे आभारप्रदर्शन डॉ. वर्षा घडयाळे यांनी केले.

Comments are closed.