gogate-college

श्री. प्रसाद गवाणकर यांच्या कथेला महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे तर्फे पुरस्कार

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे श्री. प्रसाद गवाणकर यांच्या ‘सूर्य उगवन्या अगुदर’ या भंडारी बोलीभाषेतील कथेला महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे या संस्थेतर्फे उत्कृष्ट कथेकरिता देण्यात येणारा पुरस्कार जाहिर झाला आहे. सावरकर सदन, पुणे येथे दि. २२ एप्रिल रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. जैतापूर येथील अणुउर्जा प्रकल्पग्रस्त भागावर आधारित ही कथा असून मिळालेल्या पैशाचा सदुपयोग कसा करता आला नाही यावर प्रकाश टाकणारी अशी ही कथा आहे. यापूर्वीही श्री. गवाणकर यांच्या कथांना मान्यवर संस्थांतर्फे दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. यामद्धे रत्नागिरी शहरातील साहित्य आणि कला क्षेत्रात काम करणारी सुप्रसिद्ध संस्था ‘आर्ट सर्कल’ यांच्या बोलभाषेतून व्यक्तीचित्रणात्मक कथा स्पर्धेतील विजयी कथेचाही समावेश आहे.

या पुरस्काराबद्दल गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील अध्यापक, प्राध्यापक आणि कर्मचारी यांनी श्री. प्रसाद गवाणकर यांचे हार्दिक अभिनंदन केले असून पुढील लेखनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments are closed.