gogate-college-autonomous-logo

महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ ‘आविष्कार संशोधन स्पर्धेत’ गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे सुयश

महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ ‘आविष्कार संशोधन स्पर्धा- १८-१९’ आणि पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ विद्यार्थी संशोधन स्पर्धा, अन्वेषण: २०१८-१९ या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या संघाला विजेतेपदाचा सन्मान प्राप्त झाला. मुंबई विद्यापीठाच्या विजयी संघात समाविष्ट असलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ दि. २३ जुलै २०१९ रोजी मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करून करण्यात आला.

मुंबई विद्यापीठाच्या विजयी संघात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी कु. चैत्राली कल्याणकर (वाणिज्य विभाग, पदव्युत्तर गट) आणि कु. ऋतुजा शिंदे (वाणिज्य विभाग, पदवी गट) सहभागी झाल्या होत्या. तसेच मुंबई विद्यापीठ आविष्कार स्पर्धेच्या रत्नागिरी विभागीय विजेतेपदाचा सन्मानदेखील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला यावर्षी प्राप्त झाला.

या स्पर्धेत सुयश संपादन करणाऱ्या विद्यार्थीनी आणि मार्गदर्शक प्रा. अजिंक्य पिलणकर आणि समन्वयक डॉ. मयूर देसाई यांचे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

Comments are closed.