gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

Prize Distribution

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या झेप युवा महोत्सवामध्ये वार्षिक बक्षिस समारंभाचे आयोजन करण्यात आले. विद्यमान वर्षातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करून पारितोषिके प्रदान करण्यात आली.

यावर्षी अनेक एकांकिका स्पर्धामध्ये यश संपादन केलेल्या ‘म्याडम’ या एकांकिकेच्या संघातील सहभागी विद्यार्थिनीचे विशेष कौतुक करण्यात आले. या संघाने मुंबई विद्यापीठाच्या ५१व्या युवा महोत्सवामध्ये सुवर्णपदक, सवाई एकांकिका स्पर्धेत सहभाग, पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत कोकणात प्रथमच स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. कु. स्मितल चव्हाण हिने मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवामध्ये आणि पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ ठरत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. यावेळी मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवामध्ये महाविद्यालयाच्यावतीने सादर झालेल्या माईम (कांस्यपदक), स्कीट (उत्तेजनार्थ) आणि कव्वाली (रौप्यपदक) या कालाप्रकारांतील सहभागी विद्यार्थी कलाकार विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

प्रतिवर्षी सातत्याने चढत्या क्रमाने यश संपादन करणाऱ्या क्रीडा विभागातील विद्यार्थ्यांचाही गुणगौरव करण्यात आला. चिन्मय नागवेकर- मिक्स रिले (मुंबई विद्यापीठ, रौप्यपदक), शार्दुल भुवड (राज्यस्तरीय पॉवलिफ्टिंग, कांस्यपदक), हृतीका बने (विद्यापीठस्तर खो-खो, सुवर्णपदक), नेहा नेने (राज्यस्तरीय पॉवलिफ्टिंग, कनिष्ठ गट सुवर्णपदक आणि वरिष्ठ गट रौप्यपदक), माधवी बोरसुतकर (राज्यस्तरीय खो-खो, रौप्यपदक आणि मुंबई विद्यापीठ सुवर्णपदक), आरती कांबळे (राज्यस्तरीय खो-खो, रौप्यपदक आणि मुंबई विद्यापीठ सुवर्णपदक, ४X४०० रिले सुवर्णपदक, ४X१०० मीटर रिले कांस्यपदक), प्रतीक्षा साळवी (मंगोलिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग, बेन्चप्रेस स्पर्धेत कांस्यपदक, मुंबई विद्यापीठ सुवर्णपदक), निकिता चाफळीकर (राज्यस्तरीय खो-खो, रौप्यपदक आणि मुंबई विद्यापीठ सुवर्णपदक), धनश्री शेलार (राज्यस्तरीय खो-खो, रौप्यपदक आणि मुंबई विद्यापीठ रौप्यपदक), गौरांग कुर्ले (राज्यस्तरीय पॉवलिफ्टिंग, कांस्यपदक), तेजस्विनी सावंत (राज्यस्तरीय पॉवलिफ्टिंग, सुवर्णपदक), सुचिता तेंडूलकर (राष्ट्रीय बेंचप्रेस सुवर्णपदक, राज्यस्तरीय पॉवलिफ्टिंग, कांस्यपदक), मानली लिंगायत (राज्यस्तरीय कॅरम रौप्यपदक), प्रतिमा पावसकर (मुंबई विद्यापीठ वेटलिफ्टिंग रौप्यपदक), संतोष शेलार (मुंबई विद्यापीठ वेटलिफ्टिंग रौप्यपदक) या विद्यार्थ्यांना त्यांच्या विशेष कामगिरीबद्दल गौरविण्यात आले.

महाविद्यातील अतिशय महत्वाच्या आणि नैपुण्यासाठी सदैव खडतर प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेना (एन.सी.सी.) विभागामध्ये उल्लेखनीय यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. स्वप्नील बेंदाल आणि अदिती पावसकर (स्कुबा डायव्हिंग कॅम्प, मुंबई), रोहित माने आणि प्रसन्न प्रभू (ऑल इंडिया नौसैनिक कॅम्प, कारवार), हेरंब भिडे (ऑल इंडिया नौसैनिक कॅम्प, कारवार, सुवर्णपदक), मयूर वाडेकर आणि अभिषेक राजपूत, संपदा पाटील, स्नेहल सनगरे, दिव्यता कदम (ऑल इंडिया नौसैनिक कॅम्प, कारवार), मानस सुवारे, दशरथ खैरे (ऑल इंडिया ट्रेकिंग कॅम्प, बेळगाव), मैथिली सावंत (ऑल इंडिया रिपब्लिक डे कॅम्प, दिल्ली), उद्धव कबीर (शिप अटॅचमेंट कॅम्प, मंबई), सिद्धार्थ वैद्य ( ऑल इंडिया थलसैनिक कॅम्प, दिल्ली; राज्यस्तरीय सुवर्णपदक-फायरिंग), सौरभ सरवटे (स्कुबा डायव्हिंग कॅम्प, मुंबई), श्रीरंग घाटे (ऑल इंडिया ट्रेल ट्रेक कॅम्प).

शिक्षणेतर उपक्रमांबरोबरच सहशैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन सुयश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धामध्ये सहभागी होणाऱ्या आणि उल्लेखनीय यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही गौरविण्यात आले. यामध्ये श्वेता आंब्रे (कोल्हापूर येथे झालेल्या सेमिनारमध्ये शोधनिबंध सादर), उत्कर्षा भुते (होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन करिता निवड), ओंकार पेंढारकर आणि तृप्ती जोशी (दोन वर्षासाठी रु. १०००० ची मराठी विज्ञान परिषदेची शिष्यवृत्ती), पुष्कर पाटकर (सेट परीक्षा उत्तीर्ण), चिन्मय प्रभू, नारायणी शहाणे, सौम्या पै, चारुता खेर, चैत्राली कल्याणकर, शुभांगी यादव, बॉस्को बोयेलो, धनश्री राऊत, गायत्री बापट या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांची ‘अविष्कार संशोधन प्रकल्प स्पर्धेत’ विद्यापीठ स्तरासाठी निवड झाली.

या कार्यक्रमाला गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, वाणिज्य शाखा उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, कला शाखा उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, एन.सी.सी. ऑफिसर डॉ. सीमा कदम, जिमखाना संचालक डॉ. विनोद शिंदे, झेप समन्वयक प्रा. आनंद आंबेकर आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुयोग रानडे, उत्कर्षा प्रभुदेसाई, नेहा नेने, तृप्ती धाडवे या विद्यार्थ्यांनी केले.

Prize Distribution
Prize Distribution
Comments are closed.