gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रा. अमित मिरगल यांना शिवाजी विद्यापीठाची विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रदान

Amit Mirgal

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रा. अमित मिरगल यांना शिवाजी विद्यापीठाची विद्यावाचस्पती पदवी अलीकडेच प्रदान करण्यात आली. त्यांच्या ‘इकोलोजीकल स्टडिज इन अॅटीअॅरीस टॅक्स्सीकॅरिया, सालाशिया चायनेनसीस अॅड सराका अशोका इन कोकण रिजन ऑफ महाराष्ट्र’ या प्रबंधाला शिवाजी विद्यापीठाने मान्यता दिली आहे. या अभ्यासात त्यांनी चांदकुडा, सप्तरंग आणि सीता अशोक या कोकणातील अतिशय दुर्मिळ औषधी वनस्पतींचे संवर्धन आणि परिस्थितीकिविषयक संशोधन केले आहे. या संशोधनासाठी त्यांना डॉ. सी. बी. साळुंखे, कृष्णा महाविद्यालय, रेठरे यांचे मार्गदर्शन लाभले.
श्री. अमित मिरगल सध्या वनस्पतीशास्त्र विभाग, गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे कार्यरत आहेत. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी प्रा. मिरगल यांच्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन केले आहे.

Comments are closed.