gogate-college-autonomous-logo

कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३०वी जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांच्याहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना प्राचार्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या वैयक्तिक ग्रंथ संग्रहाचा आणि अफाट वाचनाचा आदर्श घेणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. जगातील अनेक देशांनी अनेक पदव्या प्रदान करून गौरविण्यात आलेले डॉ. आंबेडकर भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार ठरले. कोणत्याही प्रश्नाला ते अत्यंत अभ्यासपूर्ण पध्दतीने सामोरे जात असत. त्यांची निरंतर अभ्यास आणि वाचनसंस्कृती आपण यानिमित्ताने पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे यांनी केले. या कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. विवेक भिडे, प्रा. भिंगारदिवे, प्रा. उकरंडे, प्रा. उरूणकर आणि ग्रंथालय कर्मचारी उपस्थित होते.

सदर कार्यक्रम शासनाच्या संपूर्ण नियमावलीच्या आधिन राहून संपन्न झाला.

Comments are closed.