gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात एड्स जनजागृती दिनानीमित्त व्याख्यान

AIDS Awareness Program

जागतिक एड्स जनजागृती दिनाचे औचित्य साधून गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, रत्नागिरी चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवस आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांची सांगता विविध उपक्रमांनी झाली. यानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.

रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील ए.आर.टी. विभागाच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. रश्मी आठल्ये यांनी ‘एड्स जनजागृतीविषयक’ मार्गदर्शन केले. आपल्या व्याख्यानात त्यांनी यावर्षीच्या ‘नो युवर स्टेटस’या संकल्पनेच्या दृष्टीने आपल्या व्याख्यानातून एड्सचे जागतिक सावट व त्यावर प्रतिबंध करण्यासाठी तथा या आजाराचे संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी शक्य असणाऱ्या सर्व उपाययोजनांवर यथोचित भाष्य केले. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांनादेखील एड्स जनजागृती तसेच २०३० पर्यंत ‘गेटिंग टू झिरो’ हे उद्दिष्ट साध्य करण्याचेदेखील आवाहन केले.

त्यानंतर विद्यापीठ निकालांमध्ये उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. चंदा बेर्डे यांनी, सूत्रसंचालन कु. वैष्णवी गुरव हिने आणि आभारप्रदर्शन प्रा. नितीन पोतदार यांनी केले. या कार्यक्रमाला उपप्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments are closed.