gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात एम.ए. आणि एम.कॉम. भाग-१ करिता प्रवेश सुरु

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या लोकमान्य टिळक पदव्युत्तर अध्यापन केंद्रामध्ये शैक्षणिक वर्ष २०१९-२० करिता एम.ए., एम.कॉम. भाग-१ या वर्गाचे प्रवेश महाविद्यालयात सुरु झाले आहेत. एम.ए. करिता अर्थशास्त्र, मराठी, इंग्रागी, समाजशास्त्र, इतिहास, संस्कृत व हिंदी (संपूर्ण); एम.कॉम. (अकौंटंन्सी) या विषयांना प्रवेश देण्यात येतो.

या वर्गासाठीचे प्रवेश दि. २९ जून २०१९ पासून कार्यालयीन वेळेत घ्यावयाचे आहेत. एम.ए. आणि एम.कॉम. करिता प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या mum.digitaluniversity.ac या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशाचेवेळी सेमिस्टर ५ व ६ परीक्षांच्या गुणपत्रकच्या झेरॉक्स ३ प्रती, शाळा सोडल्याच्या दाखल्याची १ प्रत, जात प्रमाणपत्र झेरॉक्स २ प्रति (आवश्यक असल्यास), आधार कार्ड २ झेरॉक्स, ३ रंगीत फोटो सोबत आणणे गरजेचे आहे. अन्य विद्यापीठातील विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा असेल तर इ. १० वी ते तृतीय वर्षापर्यंतची सर्व मूळ कागदपत्रे व त्याच्या प्रत्येकी ३ झेरॉक्स जोडणे आवश्यक आहे. प्रवेश अर्ज गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी वरील कालावधित आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

Comments are closed.