gogate-college

”गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘झेप’ महोत्सवात रंगली सदाबहार अशी अंताक्षरी स्पर्धा”

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात झेप महोत्सवातंर्गत अंताक्षरी स्पर्धा संपन्न झाली. यासाठी अभिजित भट यांनी परीक्षक म्हणून काम पहिले. यामध्ये शीतल पाध्ये, चिन्मय जोशी आणि कौस्तुभ काळे प्रथम, पूर्वा चुनेकर, सायली मुळ्ये, तेजस्विनी करंबळेकर यांनी व्दितिय तर मेघना बेहेरे, श्वेताली नेवरेकर, आकांक्षा जोशी यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला.
वाणिज्य शाखा उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे यांच्या उपस्थितीत ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे नियोजन प्रथम आणि व्दितिय वर्ष वाणिज्य शाखेच्या विद्यार्थांनी केले. त्यांना प्रा. विनायक गावडे आणि प्रा. चैत्राली केतकर यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यानंतर व्दितिय वर्ष शास्त्र शाखेच्या विद्यार्थांनी आयोजित ‘फनी गेम्स’ या कार्यक्रमाला देखील विद्यार्थांनी उत्तम प्रतिसाद दिला. मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा. बीना कळंबटे यांच्या उपस्थितीत आणि प्रा. अतिका राजवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)