gogate-college

मन आणि शरीर स्वास्थ्यासाठी योग – प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि नेहरू युवा केंद्र यांच्या सहयोगाने महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात ‘जागतिक योग दिना’चे नुकतेच आयोजन करण्यात आले. दि. २१ जून २०१७ रोजी महाविद्यालयात योगासनांचे प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण देण्यात आले. योगासानांसाठी प्रा. निनाद तेंडूलकर यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी विद्यार्थ्यांना योगासनांचे महत्त्व विषद करताना निरोगी आणि निर्मल मनासाठी तसेच मन आणि शरीर स्वास्थ्यासाठी विद्यार्थ्यांनी योग अंगिकारावा असे आवाहन केले. नेहरू युवा केंद्राचे समन्वयक श्री. लवंदे यांनी नेहरू युवा केंद्राचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगून या मंचातर्फे होत असणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. या नेहरू युवा केंद्रातर्फे मान्यवरांना फुलझाडांची रोपे सदिच्छा भेट म्हणून देण्यात आली. तसेच विद्यार्थी व विविध समाजसेवी संस्थांना खेळांचे साहित्य वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला अनेक विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. दानिश गनी, प्रा. मकरंद दामले, क्रीडा विभागाच्या प्रा. लीना घाडीगावकर, नेहरू युवा केंद्राचे श्री. गुरव, इतर प्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थी होते. कार्याकारामाचे सूसंचालन , राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रमाधिकारी डॉ. सोनाली कदम यांनी केले.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)