gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात “योग दिन” साजरा

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात २१ जून या ‘जागतिक योग दिवस’ साजरा करण्यात आला. दि. २७ सप्टेंबर २०१५ रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी २१ जून हा दिवस ‘योग दिवस’ म्हणून साजरा करावा असे जगातील सर्व देशांना आवाहन केले. त्यामुळे दि. २१ जून हा दिवस ‘जागतिक योग दिन’ म्हणून सर्वत्र साजरा साजरा केला जातो. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या राधाबाई सभागृहात सत्रांमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सामुहिक योगासने केली.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी ‘विद्यार्थ्यांनी नियमित योगासने केल्यास त्यांना दीर्घ आरोग्याबरोबरच उत्तम स्वास्थ प्राप्त होईल. त्यामुळे आजच्या दिवसाचे औचित्य साधून सर्वांनी संकल्प करून नियमित योगासने करावीत. आणि आपले शेजारी आणि समाजातील इतर घटक यांनाही याचे महत्व सांगून त्यांनाही प्रवृत्त करावे’ असे आवाहन केले.
हा योग साप्ताह यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर आणि सर्व शाखांचे उपप्राचार्य आणि विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. योग सप्ताहाचे आयोजन यशस्वीरित्या पूर्ण करण्याकरिता क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे, प्रा. लीना घाडीगावकर, प्रा. निनाद तेंडूलकर, प्रा. ओंकार बाणे, जिमखाना कर्मचारी श्री. महेश खैरे, श्री. आदेश पुसाळकर यांनी मेहनत घेतली. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Yoga Din
Yog Din
Yoga Day
Comments are closed.