gogate-college
swachhand-programme

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात रंगला विंदांच्या कवितांचा स्वच्छंद कार्यक्रम

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मराठी विभागाच्यावतीने गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान निर्मित विंदांच्या समग्र साहित्य निर्मितीचे दर्शन घडवणारा ‘स्वच्छंद’ हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात नुकताच संपन्न झाला.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या औचित्याने राज्य मराठी विकास संस्था प्रायोजित व वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान निर्मित बहारदार असा ‘स्वच्छंद’ कार्यक्रम महाविद्यालयात संपन्न झाला. याप्रसंगी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे श्री. वामन पंडित, श्री. अनिल फराफटे, श्री. प्रसाद घाणेकर, श्री. माधव गावकर, आणि श्रीम. हर्षदा दिक्षित उपस्थित होते.

‘स्वच्छंद’ या कार्यक्रमाची संहिता डॉ. विद्याधर करंदीकर यांची तर निर्मिती संकल्पना श्री. वामन पंडित यांची आहे. संगीत संयोजन श्री. माधव गावकर यांचे होते. शेक्सपिअरच्या किंग लिअरचे भाषांतर करताना त्यातील पंचखंडी प्रवेशाचे विंदांनी चतुष्खंडी मुक्तछंदात रुपांतर केले. त्या प्रवेशाचे वामन पंडित यांनी केलेले अभिवाचन सर्वांनाच भावले. यासह विंदांच्या गणेशस्तवन, ट्रंक, तेच ते, मानवांनो आत या रे यांसारख्या लोकप्रिय कविता, बालकविता, चुटके, त्यांच्या लघुनिबंधामधील आम्रयोग, अमृतानुभवातील ओव्या, आतताई अभंग या कार्यक्रमात सादर झाले. त्याचप्रमाणे विंदांनी त्यांच्या अष्टदर्शनमधून सात पाश्चात्य तत्वज्ञ आणि भारतीय चार्वाक यांचे जे दर्शन घडविले आहे; त्याची झलकही या कार्यक्रमात पाहायला मिळाली. या सुरेख सादरीकरणाला रसिकांच्या टाळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निधी पटवर्धन यांनी केले. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि शहरातील रसिक बहुसंख्येने उपस्थित होते.

swachhand-programme
swachhand-programme
Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)