gogate-college

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचा शिवाजी विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी असलेल्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील प्राध्यापकांशी संवाद

मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी नुकतीच गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला भेट दिली. शिवाजी विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी आणि नंतर विद्यावाचस्पती पदवीकरिता संशोधन केलेल्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील प्राध्यापकांशी संवाद साधला. भविष्यात महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठ यांच्यामध्ये शैक्षणिक सबंध प्रस्थापित होण्यास आपण उत्सुक आहोत असे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी सामाजिक निरीक्षणात्मक संशोधन करावे आणि सर्वसामान्य लोकांच्या गरजा सुलभ कराव्यात असा सल्ला दिला.

कार्यक्रमप्रसंगी र. ए. सोसायटीचे कार्यवाह श्री. सतीश शेवडे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. ए. एस. कुलकर्णी, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, डॉ. मंगल पटवर्धन, डॉ. वामन सावंत, डॉ. पी.पी. कुलकर्णी, डॉ. शाहू मधाळे, प्रा. आनंद आंबेकर, डॉ. रामा सरतापे, डॉ. माश्रणकर, डॉ. भट्टार, डॉ. सकपाळ, डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. सीमा कदम उपस्थित होते.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)