gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात यु.ए.ई. एक्सचेंज इंडिया तर्फे कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन

भारत आणि परदेशात फायनान्शियल सेक्टरमध्ये काम करणाऱ्या नामवंत अशा यु.ए.ई. एक्सचेंज इंडीया कंपनीने गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकरिता कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन केले आहे. मुंबई, पुणे आणि गोंवा याठिकाणी वरील पदांकरिता एकूण २५ जागांकरिता मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

सदरच्या मुलाखतीकरिता महाविद्यालयातून २०१५-१६ साली पदवी पूर्ण केलेले तसेच २०१६-१७ ला पदवी परीक्षा दिलेले विद्यार्थी (मुलगे) उपस्थित राहू शकतात. प्राधान्याने बी.एम.एस. आणि बी.कॉम. (अकौंटिंग फायनान्स) पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा विचार केला जाईल.

मुलाखती दि. २५ जुलै २०१७ रोजी सकाळी १० वाजता महाविद्यालयाच्या सेमिनार हॉल मध्ये होतील. मुलाखतीला येताना आपला बायोडाटा व मुळ कागदपत्रासह उपस्थित राहावे असे, कळविण्यात येत आहे. अधिक माहितीकरिता डॉ. यु. बी. संकपाळ ९७६४४१४६१२ आणि प्रा. आर. जी. सावंत ९४२११४२५२९ यांचेशी संपर्क साधावा. त्याचप्रमाणे उपलब्ध संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

Comments are closed.