gogate-college-autonomous-logo

राष्ट्राच्या सबलीकरणात निवडणुकांची भूमिका मोलाची- उपजिल्हाधिकारी श्री. अभिजित घोरपडे

Role of Election in the Empowerment of Nation

‘भारत हा जगातील सर्वात तरुण देश असून, या तरुण शक्तीला सबल केल्यास भविष्यात देश निश्चितच पुढे जाईल. देशाच्या सबलीकरणासाठी समाजव्यस्थेत परिवर्तन आणण्यासाठी निवडनुका अत्यंत महत्वाचे मध्यम आहे; असे प्रतिपादन रत्नागिरीचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. अभिजित घोरपडे यांनी केले.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात तरुण व पात्र ‘नवमतदार नोंदणी अभियान’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यासाठी उपजिल्हाधिकारी श्री. घोरपडे यांना निमंत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले की, दक्षिण आशियातील इतर नवस्वतंत्र देशांबरोबरच भारतालाही स्वातंत्र्य मिळाले. भारताने लोकशाही शासन पद्धतिचा स्वीकार केला. प्रत्येक भारतीय नागरिकाला राज्यकारभारात सहभागी होता यावे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेऊन घटनाकारांनी प्रातिनिधिक लोकशाहीचा स्वीकार केला. लोकशाही टिकविण्यासाठी निवडणुका हे अत्यंत महत्वाचे माध्यम आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक दशके भारतात लोकशाही टिकून आहे. याचे कारण म्हणजे भारतात बॅलेटच्या आधारावर कारभार चालतो; बुलेटच्या बळावर नाही. बुलेटच्या बळावर राज्य कारभार करणारे देशांची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे, याकडे त्यांनी लक्ष्य वेधले. तरुणांनी मतपेटीची ताकद ओळखून मतदार नोंदणी केली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी रत्नागिरीचे तहसीलदार श्री. मच्छिंद्र सुकटे यांनीही विद्यार्थ्यांना मतदार अभियानाविषयी मार्गदर्शन केले. कार्याक्रमाचे प्रास्ताविक गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी महाविद्यालयात शिक्षणेतर उपक्रमान्तर्गत राबवीत असलेल्या विविध उपक्रमांचा लाभ घेण्याचा लाभ घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसित होण्यास मदत होत असल्याचे सांगून अशा उपक्रमांचे दैनंदिन जीवनातील महत्व अधोरेखित केले.

कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर नायब तहसीलदार श्री. गमरे, उपप्राचार्य डॉ. मिलिंद गोरे आणि इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते. कार्याक्रमचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन राज्यशास्त्र विभागाचे प्रा. निलेश पाटील यांनी केले. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी अर्जाचे वितरण करण्यात आले.

Comments are closed.