gogate-college
Swami Swaroopanand Debate Competition

स्वामी स्वरूपानंद अंतरराज्य वक्तृत्व स्पर्धेत विवेकानंद महाविद्यालय आणि वि. स. गांगण महाविद्यालय सांघिक चषकाचे मानकरी

गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथे स्वामी स्वरूपानंद अंतरराज्य वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालय गटात वक्तृत्व स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धाना राज्यभरातून ३० स्पर्धक उपस्थित होते. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पंढरपूर येथील भागवताचार्य श्री. वा. ना. उत्पात यांच्या हस्ते संपन्न झाले.

याप्रसंगी व्यासपीठावर स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे कार्यवाह श्री. प्रकाश जोशी, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. मिलिंद गोरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. अशोक पाटील, स्पर्धा संयोजक प्रा. मकरंद दामले उपस्थित होते. स्पर्धेला प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांचे बहुमोल सहकार्य मिळाले.

स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून श्री. शिरीष दामले, सौ. सुनिता पाटणकर, प्रा. वासुदेव आठल्ये आणि श्री. इम्तियाझ सिद्दिक़ि यांनी काम पहिले.

स्पर्धेचा सांघिक चषक वरिष्ठ गटात विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर आणि कनिष्ठ गटात वि. स. गांगण कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी यांना मिळाला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे आहे.

वरिष्ठ गट- प्रथम क्रमांक- पूर्वा विष्णू मराठे (शासकीय महाविद्यालय, साखळी-गोवा); द्वितीय क्रमांक- श्रेयस दिपक सनगरे (एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालय, रत्नागिरी); तृतीय क्रमांक- अक्षता तानाजी खेडेकर (विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर); उत्तेजनार्थ प्रथम- श्रुती दिगंबर भिंगार्डे (कला वाणिज्य महाविद्यालय, लांजा); उत्तेजनार्थ द्वितीय- रोहन रंगराव आदमापुरे; सांघिक चषक- विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर; सर्वोत्तम मार्गदर्शक- डॉ. आरिफ महात.

कनिष्ठ गट- प्रथम क्रमांक- वरेण्य श्रीनिवास जोशी (वि. स. गांगण कनिष्ठ महाविद्यालय); द्वितीय क्रमांक- प्राजक्ता श्रीरंग वैद्य (अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी); तृतीय क्रमांक- स्मितल बाबासाहेब माने (वि. स. गांगण कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी); उत्तेजनार्थ प्रथम- अनघा प्रकाश पंडित (न. शा. पंत वालावलकर महाविद्यालय, देवगड); उत्तेजनार्थ द्वितीय- जानकी मिलिंद ठाकूर (न. शा. पंत वालावलकर महाविद्यालय, देवगड);

सांघिक चषक- वि. स. गांगण कनिष्ठ महाविद्यालय;

सर्वोत्तम मार्गदर्शक- विजय शांताराम गावडे.

Comments are closed.
 
  • 2017 (142)
  • 2016 (37)