gogate-college-autonomous-logo

४९ व्या मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात वाड्.मय विभागात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची मोहोर

49 Yuva Mahotsav

मुंबई विद्यापीठाच्या वतीने नुकताच ४९ वा युवा महोत्सव मुंबई येथे संपन्न झाला. यावर्षीच्या या महोत्सवात वाड्. मय विभागात रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने आपली छाप उमटविली.

४९ व्या युवा महोत्सवात हिंदी वक्तृत्व या स्पर्धाप्रकारात तृतीय वर्ष कला शाखेची विद्यार्थिनी प्रिया पेडणेकर हिने पहिल्यांदाच महाविद्यालयाला सुवर्णपदक प्राप्त करून देत इतिहास घडविला.

मराठी वादविवाद या स्पर्धा प्रकारात मैत्रेयी बांदेकर (तृतीय वर्ष विज्ञान) व कल्पेश जाधव (द्वितीय वर्ष विज्ञान) यांनी सुवर्णपदक प्राप्त केले. तर इंग्रजी वादविवाद या स्पर्धा प्रकारात दिलकश हुश्ये (तृतीय वर्ष विज्ञान) व ऐश्वर्या ओसवाल (द्वितीय वर्ष बीएम्. एस्.) यांनी रौप्यपदक प्राप्त केले. मैत्रेयी बांदेकर हिने गतवर्षी तर दिलकश हुश्ये हिने दोन वर्षांपूर्वी याच स्पर्धाप्रकारात रौप्यपदक प्राप्त केले होते. तसेच गतवर्षी झालेल्या ४८ व्या युवा महोत्सवात कथालेखन (मराठी) या स्पर्धाप्रकारात द्वितीय वर्ष कला शाखेची विद्यार्थिनी वसुमती करंदीकर हिनेही प्रथमच महाविद्यालयाला रौप्यपदक प्राप्त करून दिले.

या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांचे आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या तसेच अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या अनेक प्राध्यापकांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. यामुळेच यावर्षी ४९ व्या मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने वाड्.मय विभागात आपली मोहोर उमटविली.

वाड्.मय विभागातही सततचा सराव व कठोर मेहनत आणि योग्य मार्गदर्शन घेतले तसेच स्पर्धा जिंकण्याचा आत्मविश्वास असला तर असे यश आपणाला मिळू शकते हे या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. अशा तर्हेचे यश हे आपल्याला अनेक क्षेत्रात पुढे जाण्याकरिता आपल्यामध्ये खूप मोठा आत्मविश्वास निर्माण करून प्रेरणा देते असे हे सर्व विद्यार्थी आवर्जून सांगतात. त्यांच्या या यशावर या विभागाचे समन्वयक प्रा. जयंत अभ्यंकर यांनी विशेष समाधान व्यक्त करून सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश कांबळे, विद्यार्थी विकास कक्ष समन्वयक प्रा. उदय बोडस आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. यस्मिन आवटे यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Comments are closed.