gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या बी.एम.एस. विभागातील विद्यार्थ्यांची व्ही.एन.एस. ग्लोबल सर्व्हीसेस प्रा. लि.मध्ये निवड

पुणे येथील यशवंत इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज यांच्यावतीने नुकतेच ‘मिनी जॉब फेअर’चे आयोजन करण्यात आले होते. २० कंपन्या या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. इंजिनिअरिंग, व्यवस्थापनमधील पदवीधर किंवा पदव्युत्तर करणारे ६०० विद्यार्थी मुंबई, पुणे तसेच इतर शहरांमधील विविध महाविद्यालयातून सहभागी झाले होते.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या बी.एम.एस. विभागातील आठ विद्यार्थी प्लेसमेंट सेलच्या सहकार्याने या जॉब फेअरमध्ये सहभागी झाले होते. यातील स्वप्निल मांडवकर, वैभव जोशी, अक्षय शेरे आणि मिसबाह मसुरकर या चार विद्यार्थ्यांची निवड पुणे येथील व्ही.एन.एस. ग्लोबल सर्व्हीसेस प्रा. लि. या नामांकित कंपनीतर्फे करण्यात आली.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी अभिनंदन केले. तसेच अशाप्रकारच्या जास्तीत जास्त संधी भविष्यात महाविद्यालयाच्या विद्यार्थांना उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)