gogate-college
marathi-vidnyan-parishad

राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे यश

मराठी विज्ञान परिषद आयोजित राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा २०१७-१८ मध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘अमूर्त’ या एकांकिकेस पुणे येथील प्राथमिक फेरीत द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. सदर स्पर्धा मराठी विज्ञान परिषद, मुंबई व संस्कृतीक कार्य संचनालय, महाराष्ट्र शासन, यांच्या संयुक्त विद्यमाने घेतली जाते. ‘अमूर्त’ या एकांकिकेचे लेखन हे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी नंदिनी देसाई यांनी केले तर दिग्दर्शन रत्नागिरीतील ख्यातनाम दिग्दर्शक श्री. अनिल दांडेकर यांनी केले. बक्षिसाचे स्वरूप मानपत्र व रोख रक्कम रुपये दोन हजार अशी आहे.
ही एकांकिका प्रसिद्ध गणितज्ञ ‘फर्मा’ यांचे गणितातील संशोधन यावर आधारित आहे. गणितज्ञ ‘फर्मा’ यांनी मांडलेल्या प्रसिद्ध ‘थिअरी ऑफ नंबर्स’ या मूल्यावर आधारित आहे. ‘डायोफॅट या गणिती शास्त्रज्ञाने लिहिलेल्या ‘आरीथमॅटिक’ या पुस्तकातील संदर्भ या थेरमशी निगडीत आहे. ‘अमूर्त’ या एकांकीतेतून फर्मा या शास्त्रज्ञाने बीजगणित, प्रोबॅबिलिटी व संख्याशास्त्र मांडण्यात आले. ही एकांकिका अ.भा. मराठी नाट्य परिषद आणि सी.के.टी. कॉलेज, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अटल करंडक’ या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाली होती.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. मिलिंद गोरे, मराठी विज्ञान परिषद, रत्नागिरी शाखेचे कार्यवाह डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)