gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘स्वामी स्वरूपानंद वरिष्ठ-कनिष्ठ महाविद्यालयीन आंतर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा’ संपन्न

गेल्या १४ वर्षांची परंपरा सांभाळत स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पुरस्कृत ‘प. पु. स्वामी स्वरूपानंद वरिष्ठ-कनिष्ठ महाविद्यालयीन आंतर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा’ गोगटे जोगळेकर महाविद्यालयात नुकतीच संपन्न झाली. स्पर्धेचे उद्घाटन श्री. विजयराव देसाई, कार्याध्यक्ष, स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस यांच्या हस्ते आणि विश्वस्त श्री. हृषीकेश पटवर्धन, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, उपप्राचार्य अशोक पाटील, पर्यवेक्षिका प्रा. विशाखा सकपाळ यांच्या उपस्थितीत झाले.
स्पर्धेकरिता सांगली, मुंबई, लांजा, पाचल, वाटद-खंडाळा, भालावली अशा विविध ठिकाणाहून प्रतिसाद मिळाला. वरिष्ठ महाविद्यालातून ११ आणि कनिष्ठ महाविद्यालातून १८ स्पर्धक सहभागी झाले. त्यापैकी कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम क्रमांक अंकुर सोवनी (देवगड), द्वितिय क्रमांक दिव्या कुलकर्णी (सांगली), तृतीय क्रमांक हृतुराज सोहनी (चिपळूण), उत्तेजनार्थ श्रावणी कुलकर्णी (सांगली), धुंडिराज जोगळेकर (रत्नागिरी). वरिष्ठ महाविद्यालयातून प्रथम क्रमांक श्रेयसी शिरसाट (रत्नागिरी), द्वितीय रेणुका भडभडे (मुंबई), तृतीय हृषीकेश डाळे (रत्नागिरी), उत्तेजनार्थ मेघना बेह्ररे (रत्नागिरी), ओंकार पाठक (भालावली) यांना पारितोषिके देण्यात आली. तर सांघिक चषक वरिष्ठ गट गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि सांघिक चषक वरिष्ठ कनिष्ठ गट विलिंग्डन कॉलेज, सांगली यांनी पटवला.
स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून कनिष्ठ गट श्री. उल्हास सप्रे आणि सौ. संयोगिता सासणे तर वरिष्ठ गट श्री. गजानन पळसुलेदेसाई आणि सौ. द्राक्षायणी बोपर्डीकर यांनी काम पहिले.
पारितोषिक वितरण समारंभाकरिता स.भ. मोहनबुवा रामदासी, श्री. विजयराव देसाई, श्री. प्रकाशराव जोशी, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, स्पर्धा संयोजक प्रा. मकरंद दामले यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धा संयोजनासाठी प्रा. मकरंद दामले, प्रा. जयंत अभ्यंकर, श्री. अभिजित भिडे, प्रा. आरती पोटफोडे आणि श्री. प्रसाद गवाणकर यांनी मेहनत घेतली.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)