gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षाकडून विद्यार्थांमध्ये नवीन कौशल्ये जोपासण्यासाठी ‘कौशल्य विकास कार्यशाळेचे’ नुकतेच आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाकरिता सामाजिक कार्यकर्त्या सौ. जयाताई सामंत, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, महिला विकास कक्षाच्या समन्वयक डॉ. कल्पना आठल्ये आदि मान्यवर उपस्थित होते.

आयुर्वेदिक सौन्दर्य प्रसाधने, स्वपरिचय आणि मुलाखतींची तयारी, गॅस शिवाय खाद्य पदार्थ निर्मिती, कागदी फुले व सजावट या चार कौशल्यांचा कार्यशाळेत समावेश केला होता. डॉ. सोनाली कदम, प्रा. अनुजा घारपुरे, सौ. विभा भन्सारी, सौ. धनश्री महाडिक यांचे मार्गदर्शन लाभले. विविध विषयांवर कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात याचे मार्गदर्शन प्रा. घारपुरे यांनी केले. भेळ. खाकरा, पौष्टिक सालेड असे झटपट पदार्थ आणि त्याची माहिती सौ. भन्सारी यांनी दिली. गुलाबाची फुले, हॅगर स्टॅड सजावट सौ. महाडिक यांनी कुशलतेने तयार करून दाखीविली. विद्यार्थींनीही या प्रात्यक्षिकात सहभागी झाल्या होत्या.

सौ. जयाताई सामंत यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये मोबाईलचा वापर विद्यार्थांनी किती करावा, मुलींनी मोबईलविषयी कोणती काळजी घ्यावी या विषयी त्यांनी संवाद साधला. करियर, ध्येयपूर्ती या संदर्भात मार्गदर्शन करून अभ्यासाचा कानमंत्र दिला. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ‘स्किल इंडिया’विषयी कु. केतकी जोशी या विद्यार्थींनीने पॉवरपॉइंट सादरीकरण केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन डॉ. कल्पना आठल्ये यांनी केले. कार्यशाळेत सहभागी विद्यार्थांना प्रमाणपत्रे देण्यात आली.

Comments are closed.