gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची युएई एक्स्चेंज इंडिया लि. मध्ये निवड

भारत तसेच भारताबाहेर फायनान्शियल सर्व्हिसेस क्षेत्रामध्ये नामवंत असलेल्या युएई एक्स्चेंज या कंपनीच्या ‘फिल्ड सेल्स ऑफिसर’ च्या पदांकरिता रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेल कडून कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन मंगळवार दि. २५ जुलै रोजी करण्यात आले होते. यामध्ये महाविद्यालयातील सहभागी विद्यार्थ्यांमधून प्राथमिक निवड फेऱ्यामधून अंतिम एच. आर. इंटरव्ह्यूकरिता सहा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

कंपनीतर्फे श्री. जोशी तसेच श्री. लाड यांनी संपूर्ण प्रक्रिया पार पाडली. त्याचप्रमाणे प्लेसमेंट सेलच्यावतीने डॉ. उमेश संकपाळ आणि प्रा. रुपेश सावंत यांनी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर इंटरव्ह्यूचे आयोजन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)