gogate-college
maharaja-1

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘झेप युवा महोत्सवा’ची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता द्वितीय वर्ष विज्ञान विभाग ठरला ‘महाराजा करंडक’ विजेता

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘झेप युवा महोत्सवा’ची रंगतदार अशा बक्षिस वितरण समारंभाने उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली. यानंतर मानाचे असे क्लास चॅम्पियनशिप आणि महाराजा करंडक या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
‘झेप युवा महोत्सवा’तील वैशिष्टयपूर्ण असणाऱ्या स्पर्धेत सर्वोत्तम व्यवस्थापन करणाऱ्या समूहाला महाराजा करंडकाचा सन्मान दिला जातो. यावर्षी द्वितीय वर्ष विज्ञान विभागाने या करंडकावर आपले नाव कोरले. त्यांनी गीतगायन स्पर्धेचे नेटक्या पद्धतीने आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कस्तुरी भागवत हिने केले. पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे आयोजन करणारा द्वितीय वर्ष कला शाखेला द्वितीय क्रमांक आणि ग्रुप डान्स स्पर्धेचे आयोजन करणारे तृतीय वर्ष वाणिज्य आणि अकौंटिंग फायनान्स या विभागातील विद्यार्थी तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. तर मनाच्या अशा ‘क्लास चॅम्पियनशिप’मद्धे अव्वल क्रमांक तृतीय वर्ष विज्ञान, द्वितीय क्रमांक प्रथम वर्ष कला आणि तृतीय क्रमांक द्वितीय वर्ष विज्ञान यांनी पटकावला. संपूर्ण कार्यक्रमात सर्वाधिक यशस्वी सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गोल्डन बॉय आणि गोल्डन गर्ल हा किताब देण्यात येतो. या पुरस्काराचे यंदा नचिकेत देसाई आणि भक्ती दळवी यांना बहाल करण्यात आले.
झेप युवा महोत्सवात संपन्न झालेल्या विविध स्पर्धांमधील यशस्वी स्पर्धा संयोजन करणाऱ्या संघांना, प्रदर्शने आयोजित करणाऱ्या संघांना इ. सर्व संघांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अंतिम पारितोषिक वितरण समारंभात संशोधन, कला, क्रीडा, एन.सी.सी., एन.एस.एस., आजीवन अध्ययन, सांस्कृतिक विभाग, वाड्मय विभाग यांतील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यापूर्वी गीतगायन स्पर्धा संपन्न झाली. ७०च्या दशकापासून आजवरच्या अनेक गीतांचा नजराणा सादर करण्यात आला. सायली मुळ्ये, दुर्गा साखळकर, आदिती जोशी आणि प्रणेत्री पांचाळ स्पर्धेचे विजेते ठरले. स्पर्धेचे परीक्षण संध्या सुर्वे आणि अभिजित नांदगावकर यांनी केले. झेप युवा महोत्सवामद्धे अनेक महाविद्यालयीन प्राध्यापकांनी स्पर्धा संयोजक म्हणून यशस्वीपणे काम पाहिले.
पारितोषिक वितरण आणि गुणगौरव सोहोळ्याकरिता र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, उपकार्याध्यक्ष अॅड. विजय साखळकर, सचिव श्री. सतीश शेवडे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी, उपप्राचार्या कला शाखा डॉ. चित्रा गोस्वामी, उपप्राचार्या वाणिज्य शाखा डॉ. यास्मिन आवटे, उपप्राचार्य विज्ञान शाखा डॉ. मिलिंद गोरे, झेप समन्वयक प्रा. आनंद आंबेकर, क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. निधी पटवर्धन, १९९५चे माजी विद्यार्थी आणि महाराजा ग्रुपचे सदस्य श्री. बिपीन शिवलकर, श्री. प्रशांत बापर्डेकर, अॅड. सुजित कीर, श्री. संदेश कीर, श्री. राजेश जाधव आणि सौ. राजश्री शिवलकर आवर्जून उपस्थित होते.

h
h
h
h
Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)