gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात रत्नागिरी जिल्हा युवा महोत्सव २०१७ चे आयोजन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शुक्रवार दि. ११ ऑगस्ट २०१७ रोजी ‘रत्नागिरी जिल्हा युवा महोत्सव’चे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या ५०व्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवाची ही जिल्हास्तरीय निवडफेरी असून यामद्धे दक्षिण रत्नागिरी विभागातील एकूण १६ महाविद्यालये सहभागी होणार आहेत. गायन, वादन, नृत्य, एकपात्री अशा विविध ३५ कलाप्रकारांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात या महोत्सवाच्या अनुषंगाने सर्व तयारी पूर्ण झाली आहे; अशी माहिती गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी दिली आहे.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)