gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयामद्धे ‘उपयुक्त गणित’ या विषयावरील राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धा संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या गणित विभागाने नुकतेच ‘उपयुक्त गणित’ या विषयावरील राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धेचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती निर्माण व्हावी आणि सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना आपले वैचारिक मत संगणकीय सादरीकरणाद्वारे सर्वांसमोर मांडता यावे हे उद्दिष्ट समोर ठेऊन गणित विभागाने या स्पर्धेचे आयोजन केले होते.
विविध महाविद्यालयातील या स्पर्धेत सहभागी झाले. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी होते. फिनोलेक्स कॉलेजच्या गणित विभाग प्रमुख डॉ. एस. बी. कुलकर्णी आणि मॉडर्न कॉलेज, पुणेच्या गणित विभाग प्रमुख डॉ. कंधारकर यांनी स्पर्धेच्या परीक्षणाचे काम पहिले.
स्पर्धेचे विजेते पुढीलप्रमाणे आहेत. प्रथम क्रमांक कु. कस्तुरी बी. भागवत (गोगटे जोगळेकर महाविद्यालय), द्वितीय क्रमांक पल्लवी कदम, वैष्णवी टिपुगडे आणि श्रुती चव्हाण (गोगटे जोगळेकर महाविद्यालय), तृतीय क्रमांक ऋषिकेश दाते आणि श्रीधन पांचाळ (फिनोलेक्स कॉलेज) तर उत्तेजनार्थ प्रथमेश शितुत, विक्रांत झोरे आणि अद्वैत हळबे (फिनोलेक्स कॉलेज).
स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभाला गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर उपस्थित होते. विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. गणित विभागप्रमुख डॉ. राजीव सप्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा संपन्न झाली. सूत्रसंचालन प्रा. उमा जोशी आणि श्रद्धा सुर्वे यांनी केले.

Comments are closed.
 
  • 2019 (65)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)